लसीकरणामध्ये भारत जगभरात अव्वल; शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून नागरिकांचे अभिनंदन
मुंबई: देशात कोरोनाच शंभर कोटी लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल देशातील नागरिकांचं अभिनंदन केले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी गुरुवारी सांगितले की, हे यश भारताचे आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाचे आहे. ते म्हणाले, ‘मी देशातील सर्व लस उत्पादक कंपन्या, लस वाहतुकीमध्ये गुंतलेले कामगार, आरोग्य क्षेत्रातील कर्माचारी या सर्वांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो.
आज, 21 ऑक्टोबर 2021 चा हा दिवस इतिहासात नोंदविण्यात आला आहे. भारताने काही वेळापूर्वी शंभर कोटी डोसचा आकडा पार केला आहे. भारताने आज इतिहास रचला आहे. भारताने अवघ्या नऊ महिन्यांत ही कामगिरी केली आहे. की, 100 वर्षातील सर्वात मोठ्या साथीचा सामना करण्यासाठी, देशाकडे आता 100 कोटी लसींच्या डोसची मजबूत संरक्षणात्मक ढाल आहे. आपल्या एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, ‘आपण 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेचा, भारतीय उद्योग आणि विज्ञानाच्या विजयाचे साक्षीदार आहोत. 100 कोटी डोसचा आकडा पार केल्याबद्दल मी राष्ट्राचे अभिनंदन करतो. हे रेकॉर्ड बनवण्यात योगदान दिलेल्या डॉक्टर, नर्सेससह सर्व लोकांचे मी आभार मानतो.
पंतप्रधान म्हणाले की, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्र, खाजगी क्षेत्र, सामाजिक संस्थांनी देशाच्या आरोग्य सेवांना बळकट करण्यासाठी सतत योगदान दिले आहे. आयुष्मान भारत- पीएमजेएवाय हे देखील याचे उत्तम उदाहरण आहे. आज एम्स झज्जरमध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठी सोय झाली आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये बांधलेल्या या विश्राम सदनमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चिंता कमी होईल.