मोठी बातमी: लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिनला मान्यता; मोफत मिळणार लस
मुंबई: केंद्र सरकारकडून 2-18 वयोगटासाठी Covaxin लशीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांनासुद्धा करोना पासून दूर ठेवण्यात मोठी मदत होणार आहे. करोनाच्या येणाऱ्या संभाव लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचे वर्तविण्यात आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरणसुद्धा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.
DCGI ने कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीकडून या वयोगटातील मुलांसाठी लशीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता लवकरच ही स्वदेशी लस मुलांना दिली जाईल.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 12 वर्षांवरील मुले आणि कोविड कंडिशन असलेल्या मुलांना प्राधान्य दिले जाईल. मुलांना करोनाची लस मिळणार आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पालकांना दिलासा मिळणार आहे.