पुण्यातील बालेवाडी परिसरात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला, 12 जण जखमी, 6 जणांची प्रकृती गंभीर

पुणे: पुण्याच्या बालेवाडी परिसरात मोठी दुर्घटना घडली. निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या  गाड्या घटनास्थळी असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

पुण्याच्या बालेवाडी येथील पाटील नगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब  अचानक कोसळला. रात्री या बिल्डिंगचा स्लॅब तयार करण्याचे काम सुरु होते त्यावेळी अचानक स्लॅब कोसळला. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली. 12 कामगार स्लॅब तयार करण्याचे काम करत होते त्याच दरम्यान त्यांच्या अंगावर स्लॅब कोसळला.

या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केले. जखमी झालेल्या 12 जणांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कामाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंत्याने सर्व जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी झालेल्या 12 कामगारांपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान स्लॅबखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध घेत होते. पण स्लॅबखाली कोणीही अडकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Read Also :

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!