आर. आर. आबांच्या मुलीची भावनिक पोस्ट, मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का?

27

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांचं निधन होऊन सात वर्षे झाली आहेत. 8 नोव्हेंबर 2014 ला त्यांचं निधन झालं. त्यांच्या साधेपणाचे किस्से आणि त्यांचं कर्तृत्व याची आठवण आजही काढली जाते. त्यांची मुलगी स्मिता हिने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ही फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. याचं कारण यामध्ये तिने लिहिलेली एक ओळ. मृत्यू पप्पांना आधीच दिसला होता का? ही ओळ तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिली आहे. त्यामुळे या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते आहे.

काय आहे स्मित यांची पोस्ट?

पप्पाचा शेवटचा दिवस!

आज 8 नोव्हेंबर … बरोबर 7 वर्ष झाली . माझ्या वडीलाना आज घरातून शेवटचे बाहेर जाऊन .. ! आजच्या दिवशी 2014 मध्ये सकाळी 11 वाजता माझ्या वडिलांनी घर सोडले. काही दिवस दिल्लीला विश्रांतीसाठी निघालोय असं पप्पांनी माझ्या आजीला सांगितले होते.

3 नोव्हेंबरला नवीन विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात पप्पांनी अत्यंत घणाघाती भाषण केले होते . या भाषणाचे महाराष्ट्र विधानसभेने टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले होते. 6 नोव्हेंबर ला पप्पा अंजनीला घरी आले हेलिकॉप्टर मधून सगळं गाव दोन – दोनदा फिरून बघितले. घरातून बाहेर जाताना पप्पा नेहमी उपस्थित सर्व लोकांना अभिवादन करत असत त्याच प्रमाणे खिडकीतून सर्व कुटुंबीयांकडे बघून जात असत.

मात्र त्या दिवशी मात्र पप्पा जाताना लोकांच्या मधून वेळ काढून मी आणि माझी बहिण सुप्रिया आम्ही वरती आमच्या रूम मध्ये होतो. तर पप्पा त्या दिवशी वरती येऊन आम्हा दोघा बहिणींना घट्ट मिठी मारली व त्या क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी उभारले होते. आम्ही दोघी बहिणी ही विचार करू लागलो की पप्पाना काय वाटले असावे की पप्पांनी मिठ्ठी मारली व प्पपा च्या डोळ्यात का पाणी उभारले असावे ? पण आम्हाला वाटले नव्हते की,आज पप्पा नी आम्हाला शेवट चे खुशीत घेतले असावे व त्या दिवशी पप्पांनी गावच्या मारूती – शंकराचेही न चुकता दर्शन घेतलं होते.

स्वतःच्या गावात चावडीसमोर निवडून आल्याबददल सत्कार स्वीकारताना पप्पा म्हणाले होते की,स्वतःच्या गावाकडून हा माझा शेवट चा सत्कार ठरावा ! आता आणखी किती सत्कार करणार .. ? मृत्यू पप्पा ना अधीच दिसला होता का ?

Get real time updates directly on you device, subscribe now.