कोरोना काळात वाढलेले भाडे आता कमी होणार; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई: कोरोना काळात रेल्वेचे भाडे वाढ करण्यात आली होती. आता सर्व काही पुर्वपदार येत आहे. कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच केद्र सरकारकडून रेल्वे प्रवाशाला मुभा देण्यात आली असल्याने काल (मंगळवारी) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाडे कमी करण्यात संबंधात मोठी घोषणा केली आहे.

लवकरच ट्रेनवरून स्पेशल टॅग हटवण्याची आणि वाढलेले भाडे कमी करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी ओडिशामधील झारसुगुडा दौऱ्यावर असताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की कोरोना महामारीचे  संकट कमी होत असतानाच आता रेल्वे गाड्यांची वाहतुकदेखील सुरळीत होते आहे. पुढील दोन-अडीच महिन्यात ट्रेनवरून स्पेशल टॅग काढला जाईल.

याचबरोबर प्रवाशांना कोरोना संकटाआधीच्या व्यवस्थेनुसार कमी भाडे द्यावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष श्रेणीच्या प्रवाशांसाठी आधीप्रमाणेच रेल्वेभाड्यात सवलत दिली जाणार आहे. रेल्वे मंत्रालय परिस्थितीवर नजर ठेवून आहे. रेल्वे मंत्र्यांनी दक्षिण-पूर्व रेल्वे आणि पूर्व किनाऱ्यावरील रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली.

रेल्वेमंत्र्यांनी म्हटले की तीन रेल्वे विभागात विभागले गेलेल्या झारसुगुडाला वेगळे डिव्हिजन देण्यासाठीच्या मागणीचा किंवा याला पूर्व किनाऱ्यावरील विभागात समाविष्ट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होते आहे. रेल्वे मंत्रालय यावर विचार करते आहे. रेल्वे मंत्री म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेचे जे पूर्वोद्यचे धोरण ठेवले आहे त्यात ओडिशाचे स्थान प्रमुख आहे. येथील समस्या एक-एक करत सोडवल्या जात आहेत.