‘कोई नाचनेवाली बोलती है…’ कंगनावर वडेट्टीवारांची खोचक टीका

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महात्मा गांधी यांच्याविषयी देखील वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधी यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे.

यावरून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगनावर खरमरीत टीका केली आहे. कंगना ही नाची आहे, तिची महात्मा गांधींबद्दल बोलायची लायकी नाही अशा शब्दात वडेट्टीवार यांनी कंगनावर निशाणा साधला.

कंगना ही एक नाची आहे. ती जे काही बोलतेय त्यावर प्रतिक्रिया काय देणार. ती वादग्रस्त व्यक्ती आहे. तिच्याबद्दल १० जणांना विचारलंबतर ९ जण तिच्याबद्दल वाईटच सांगतील. महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलायची तिची लायकी नाही. सूर्यावर थुंकल्यावर थुंकी स्वतःवर पडणार, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी कंगना रनौतला सुनावलं.

आज बाळाससाहेबांना आबाजीबादन करण्यासाठी स्मृतिस्थळाला आलो. हे स्थळ ऊर्जा आणि शक्ती देणारं स्थळ आहे. आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बळ मिळतं. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. माझी सुरुवात बाळासाहेबांच्या आशिर्वादाने सुरु झाली, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.