काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

14

मुंबईः काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर येत्या 29 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा सातव याचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सातव यांनी हा अर्ज दाखल केला.

दिवंगत शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, हे निश्चित, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.