बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहच्या ‘83’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

18

मुंबई: अभिनेता रणवीर सिंह स्टारर चित्रपट ‘83’ चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. हा चित्रपट कधी चित्रपटगृहात दाखल होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.

आता याचा एक छोटासा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सुंदर आठवणीची एक छोटीशी झलक सादर करत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून जाल, जेव्हा भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

आज (26 नोव्हेंबर) सकाळी रिलायन्स एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवरून रणवीर सिंहच्या ’83’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. 59 सेकंदांच्या या टीझरमध्ये क्रिकेटच्या मैदानाची झलक पाहायला मिळाली आहे. जिथे भारताचा सामना दाखवला आहे, ज्यात भारताने इतिहास रचला होता.

स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी असून, सामना एका रोमांचक वळणावर असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. मग, फलंदाज चेंडूला जोरदार टोलवतो आणि 2 खेळाडू चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतात, त्यापैकी एक रणवीर सिंह आणि दुसरा जतिन सरना आहे. दोघेही जवळ येताच टीझर संपतो. टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या या एका सीनमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.