प्रीपेडनंतर आता पोस्टपेड यूजर्सला धक्का, व्होडाफोन आणि आयडियाचे प्लान महागणार!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून दूरसंचार क्षेत्रात प्रचंड हालचाली होताना दिसत आहेत. प्रीपेड प्लॅनच्या किमतीत झालेली वाढ हे त्या मधील एक कारण आहे. अलीकडेच एअरटेल, व्होडाफोन -आयडिया  आणि रियालयन्स जिओने प्रीपेड प्लॅनच्या दरात वाढ केली. ज्यामुळे त्यांच्या वापरकर्त्यांना धक्का बसला आहे.

त्यामुळे आता वापरकर्त्यांना हे प्लॅन खरेदी करण्यासाठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे कुठेतरी वापरकर्ते देखील खूप नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत समोर आलेल्या एका नवीन अहवालानुसार, प्रीपेडनंतर आता पोस्टपेड यूजर्सनाही मोठा झटका बसणार आहे. कारण एअरटेल आणि व्होडाफोन -आयडिया त्यांच्या पोस्टपेड प्लान्सच्या किमती वाढवणार आहेत.

एका रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया आता लवकरच त्यांच्या पोस्टपेड प्लान्सच्या  किमती वाढवणार आहेत. यामुळे पोस्टपेड प्लॅन वापरकर्त्यांना फारसा फरक पडणार नाही. कारण पोस्टपेड प्लॅन वापरकर्ते सहसा त्यांच्या प्लॅनमध्ये जास्त बदल करत नाहीत. पण पोस्टपेड प्लॅन महाग झाल्याने वापरकर्त्यांचा खिसा नक्कीच रिकामा होईल. मात्र, याबाबत एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

जेफरीजच्या अहवालानुसार पोस्टपेड मार्केटचा महसूल 22,000 कोटी रुपये आहे. पोस्टपेड वापरकर्त्यांचा  वाटा संपूर्ण दूरसंचार क्षेत्रातील सक्रिय सदस्यांपैकी 5 टक्के आहे. दूरसंचार कंपन्यांना 15 टक्के उत्पन्न फक्त पोस्टपेड सेग्मेंटमधून मिळते. यापैकी 50 ते 60 टक्के ग्राहक हे एंटरप्राइझ ग्राहक आहेत आणि 34 टक्के पोस्टपेड ग्राहक हे देशातील तीन महानगरांतील आहेत. तर शहरी केंद्रीत ए-सर्कलचे जवळपास 36 टक्के सदस्य आहेत. दूरसंचार ऑपरेटर्सबद्दल बोलायचे तर, व्होडाफोन आयडियाचा मार्केटमध्ये सर्वात जास्त हिस्सा आहे. जो 43 टक्के आहे. तर एअरटेलचा मार्केटमधील हिस्सा 28 टक्के आहे.