तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

7

गणेश सराळे (SBI RISOD)

रिसोड: आज उदासीकरण जागतिकीकरण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय समुदायात उल्लेखनीय विकास होत असला, तरी समाजातील अनेक समकालीन प्रश्न विचलनाच्या  विविध समस्या अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे.  गेली काही वर्षे महाराष्ट्रमध्ये विदर्भ, मराठवाडा, तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशामध्ये घडणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या करून आणि खेदजनक ताज्या बातम्या ऐकत आहोत.

कर्जबाजारी, दारिद्रय उपासमारी इत्यादी कारणे त्यामागे असल्याचे दिसून येते. परंतु या जोडीला आता तरुण पिढी विशेषता विद्यार्थी वर्गाच्या आत्महत्येचे सत्र चालू झाल्याने समाजात तरुणाची आत्महत्या एक अदृश्य जागतिक समस्या म्हणून समोर येत आहे.

आत्महत्या या दुर्दैवी घटनेत जगाच्या पाठीवर कोणता समाज कोणता देश हा अपवाद नाही समाजात अनेक शतकापासून अशा घटना शतकापासूनच या घटना घडत आहेत. आपण केवळ चिंताग्रस्त होऊन भागणार नाही. समाज, शासन प्रत्येक देशाचा प्रकल्प नागरिक पालक-शिक्षक शिक्षक संस्था यांनी अंतर्मुख होऊन याबाबत विचार करणे ही सर्व समोरील आव्हान बनले आहे.

भारतात हजारो वर्षापूर्वी नांदला तपशील तक्षशिला या सारखे महान विद्यापीठ ज्ञानदानाचे कार्य करत करत एकाच वेळी दहा ते वीस हजार विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असत त्या काळात विद्यार्थी आत्महत्या करत होते. असा कुठलाच ग्रंथात उल्लेख नाही. पण आज मात्र हे चित्र पालटले आहे. म्हणून चुकले कुठे? कोणाचे? यांची उत्तरे शोधलीच  पाहिजेत. तरुणांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी कोणती परिस्थिती कारणीभूत आहे?  त्यांना समाजात कोणत्या समस्या भेडसावतात? रोजच्या घटनांची संख्या का वाढत आहे? तरुणांत्या आत्महत्येचे दुदैवी सत्र कसे थांबवावे यामागील कारणे कोणती? याची उत्तरे शोधलीच पाहिजेत.

आज मला खूप गहिवरून आलं

गळफासाचं कृत्य जेव्हा कानावर आलं

किती आशा आकांशा माय बाप करतो

किती किती अरे बाप तुझ्यासाठी राबतो

आपल्या भल्यासाठीच तो कधी कधी ओरडतो

त्याचा विपरित अर्थ आपण मनाशी लावतो

कानावर विश्वास करणच आता मुश्किल झालं

गळफासाच कुत्य जेव्हा कानावर आलं

लेकरांना मिळाया घर अन् उबदार चादर

जवानी टांगून तो सहतो हिमसागर

कधी कधी वितभर मिळत नाही बापाला भाकर

तरी खुशाली सांगताना फोनवर देतो जेवायचा खोटा ढेकर

दुधाचं बाळा तु असं करुन चांगलच ऋण अदा केलं

तुझ्या गळफासाच कृत्य जेव्हा कानावर आलं

 

गणेश सराळे (SBI RISOD)

Get real time updates directly on you device, subscribe now.