रखडलेल्या पगारामुळे, 24 तासात एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

पंढरपूर: बीडमध्ये पगार वेळेवर न झाल्याने चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली हेती. तसेच तर पंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, मात्र त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात सहाय्यक मेकॅनिक म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.

पगार वेळेवर न झाल्याने बीड आगारातील चिंताग्रस्त बस चालकाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार होत असतो, परंतु गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्याने येथील अनेक कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यातील एका वाहन चालकाने 11 ऑक्टोबर रोजी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान 12 ऑक्टोबर रोजी राज्य परिवहन महामंडळाने रखडलेले वेतन जारी केल्याची घोषणा केली. त्यापूर्वीच या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, पंढरपुरातही एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच गिड्डे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!