रिक्षा चालकाने सिग्नल तोडल्याने फॉर्च्युनरचा भीषण अपघात ; एकाचा मृत्यू

19

मुंबई: रिक्षा सिग्नल तोडून जात असताना त्याच मार्गावरुन भरधाव फॉर्च्युनर कार चालली होती. यावेळी रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार डाव्या बाजूला दुभाजकाला ठोकून 3 ते 4 वेळा उलटली आणि शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईत रविवारी हा अपघात झाला.

नवी मुंबईतील पामबीच मार्ग अक्षर सिग्नलवर बेलापूरकडून सीवूड्सच्या दिशेने जाणारी रिक्षा सिग्नल तोडून जात होती. तेवढ्याच कालावधीमध्ये अतिशय वेगाने फॉर्च्युनर कार वाशीकडून बेलापूरच्या दिशेने चालली होती. यावेळी रिक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्च्युनर डाव्या बाजूला डिव्हायडरवर आपटली.

गाडी तीन ते चार वेळा पलटी मारुन पुढे बरोबर शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. या अपघातात फॉर्च्युनरमध्ये असलेले पाच जण आणि रिक्षामध्ये असलेले दोघे प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून पुढचा तपास एनआरआय पोलीस करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.