तब्बल 21 वर्षानंतर भारताला मिळालं विजेतेपद; हरनाज कौर संधू ठरली ‘मिस युनिव्हर्स’

मुंबई: भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगाला भुरळ घातली. जागतिक पटलावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारली आहे. हरनाजने मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून, तब्बल 21 वर्षानंतर भारताला हा सन्मान मिळाला आहे. यापूर्वी लारा दत्ताने 2000 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धेत विजेता ठरली होती.

‘मिस युनिव्हर्स 2021’च्या स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारत 70वी मिस युनिव्हर्स होण्याचा किताब पटकावला आहे. भारताला 21 वर्षानंतर मिस युनिव्हर्सचं विजेतपद मिळालं आहे.

इस्रायलमधील एलियटमध्ये 70वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताच्या हरनाज कौरने पहिलं क्रमांक पटकावतं विजेतेपदावर नावं कोरलं. भारताला आतापर्यंत तीन वेळा मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला असून, शेवटचा किताब अभिनेत्री लारा दत्ताने 2000 मध्ये पटकावला होता.

कोण आहे हरनाझ संधू?

हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे.