अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती अत्यंत गंभीर

12

लंडन : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीने ओवेसी यांचे लहान भाऊ आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 20 दिवसांपासून अकबरुद्दीन ओवेसी लंडनमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आणखी काही दिवस अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु राहणार आहेत.

2010 साली अकबरुद्दीन ओवेसी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या शरीरातील आयर्न कंटेट कमी झाला होता.