ओमिक्रॉनचा संसर्ग वाढतोय, मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज – किशोरी पेडणेकर

21

मुंबई: ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढतोय. परंतु मुंबईकरांनी घाबरून जाऊ नका, तुमच्यासाठी यंत्रणा सज्ज आहेत. प्रत्येकाला काळजी घ्यावी लागेल. तसेच विनामास्क घराबाहेर जाऊ नये, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महापौर म्हणाल्या की, मुंबईमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असा प्रश्न पत्रकारांनी किशोरी पेडणेकर यांना विचारला असता, यासंदर्भात अद्यापतरी माहिती माझ्याकडे आलेली नाहीये. कारण संचारबंदी आणि हॉटेलचं जर आपण कनेक्शन बघितलं तर एखाद्याला खायचं जरी असलं तरी दहा पैकी एकच जण हॉटेलमध्ये वस्तू किंवा एखादं खाद्य घेऊन जाण्यासाठी येतात. त्यामुळे पाचपेक्षा जास्त व्यक्ती असतील तर त्यांना हा नियम लागू होतो.

अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु नागरिक या कोरोनाला कंटाळली आहे. पंतप्रधानांपासून ते थेट मुख्यमंत्री आणि प्रशासनही नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी आवाहन करत आहेत. मॉल्स , दुकानं आणि बसस्टॉपवर सुद्दा गर्दी होताना दिसत आहे. शक्यतो नागरिकांनी आणि प्रवाश्यांनी ती टाळावी. कारण जर कोरोना आणि ओमिक्रॉनचा वेग वाढला तर ते धोकायदायक ठरू शकतं. संकट जरी छोटं असलं तरी प्रशासनासोबत हे टाळण्याचं काम जनतेनी केलं पाहीजे. ओमिक्रॉनच्या संकटाला मुंबईची जनता नक्कीच साथ देईल, असं मला वाटतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.