सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्याने ‘हे’ होतील फायदे; वाचा सविस्तर माहिती

226

गूळ हा पदार्थ शरीरासाठी फार उपयुक्त आणि औषधी आहे. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. उसापासून तयार होणारा हा पदार्थ सगळ्याच प्रकारे शरीरासाठी फायद्याचा आहे. सुरुवातीच्या काळात सर्वत्र लोकांना गुळ पुढे करायचे. म्हणजे कोणी पाहूणे देखील घरी आले तरी, त्यांना चहा ऐवजी गुळ आणि पाणी पुढे करण्यात यायाचे. आता आपण याचा वापर फारच कमी केला आहे आणि त्या ऐवजी आपण साखरेचा वापर करणं सुरु केलं आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, साखरेऐवजी गूळ शरीरासाठी जास्त चांगले आहे.

पचनशक्ती सुधारण्यास होते मदत

रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवता येते. तसेच, पचनशक्ती मजबूत होते. वास्तविक, त्यात फ्युक्रोज असते. जे पचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. तसेच, याचे नियमित सेवन केल्याने शरीरात पचनाचे एन्झाइम सक्रिय होतात. त्यामुळे पोट फुगणे सारख्या समस्या कमी होतात.

लोहाची कमतरता होते दूर

लोह, फोलेट सारखे पोषक घटक गुळामध्ये आढळतात. जे शरीरातील रक्त पेशी कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. त्यामुळे नियमितपणे रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्यास शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.

मासिक पाळीच्या समस्या होतात दूर

सकाळी गुळाचे सेवन केल्याने मासिक पाळीच्या समस्या कमी होतात. शरीरातील वेदना आणि पेटके कमी करण्यासाठी हे प्रभावी आहे. याव्यतिरिक्त रक्त प्रवाह देखील सुधारण्यास मदत होते. अशा परिस्थितीत, मासिक पाळी दरम्यान सकाळी गुळाचे सेवन करणे आपल्यासाठी प्रभावी ठरू शकते.

Get real time updates directly on you device, subscribe now.