खसखस म्हणजे नेमकं काय? खसखस कुठून मिळते? जाणून घ्या!

अफूच्या बोंडातील बी म्हणजे आपण वापरतो ती खसखस. कित्येक जणांना हि गोष्ट माहित नसेल. दिवाळीतील अनारसे बनवतांना त्यावर खसखस वापरली जाते तसेच बाळंतीणीला  खसखसची लापशी खाऊ घालतात, इथपर्यंतच खसखस आणि आपली ओळख.

खसखस कशी मिळवतात ? त्याआधी बघूया अफूबद्दल थोडी माहिती.

अफूच्या कच्च्या फळांना चिरा पाडून चिरा पाडल्यावर फळातून रस पाझरतो; वाळून घट्ट झालेला रस म्हणजे अफू. मादक पदार्थ म्हणून अफूची लागवड प्राचीन काळापासून होत आली आहे. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे. अफूचे शुद्धीकरण, प्रत, विक्री, निर्यात, अल्कलॉइडांची निर्मिती इत्यादी सर्व बाबी सर्वस्वी भारत सरकारच्या आधिपत्याखाली होतात. भारत हा जगातील एकमेव मान्यता प्राप्‍त अफू निर्माण करणारा देश आहे.

पॅपॅव्हर सॉम्निफेरम’ असं शास्त्रीय नाव असलेल्या अफूच्या बिया म्हणजे खसखस. भारतीय खसखस ही प्रामुख्याने पांढरी असते तर युरोपियन खसखस ही निळी किंवा काळी असते. इंग्रजीत ‘पॉपी सीड्स’, हिंदीत ‘खसखस’, कन्नडमध्ये ‘घस घस’ तर बंगालीत ‘पोस्तो’ असं म्हटलं जातं. खसखशीचं कवच खूप कठीण असतं. त्यामुळे ती दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून नंतर वाटली जाते. त्यानंतर कढईत कोरडी भाजून तिची पूड केली जाते. पाण्याबरोबर पेस्ट केली जाते. खसखशीत काही प्रमाणात ‘ई’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन, मँगनीज, मॅग्नेशिअम, तांबं, पोटॅशिअम आणि जस्त यांचं प्रमाण असतं.

खसखसचे चे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठीचे फायदे :

खसखशीच्या आवरणातील उपलब्ध तंतूंमुळे पोट साफ होण्यास मदत होते तसंच हा तंतू कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होणारी रसायनांमध्ये बंध निर्माण करतो. त्यामुळे विघातक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.आणि परिणामी हृद्यरोगाचा धोका कमी होतो.

खसखस वाटून अंगाला लावल्यास त्वचा मृदू होते.

दोन चमचे खसखस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते.

हाडांच्या मजबुतीसाठी आणि योग्य वाढीसाठी खसखस खाणे फायदेशीर ठरते.

खसखस च्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

निद्रानाशावरही खसखशीचा काढा घेतल्यास उपयुक्त ठरतो. खूप जुलाब होत असल्यास खसखशीच्या बिया वाटून त्याची लापशी किंचित जायफळ व सुंठ चूर्ण मिसळून घ्यावी.

खूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळय़ात खसखस लापशी जरूर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा.

हाय ब्लड प्रेशर आणि रक्ताल्पता दुधातून खसखस घेतल्याने दूर होते.

श्वसनासंबंधी विकारांवर दुधातून खसखस घेतल्यास त्वरित आराम पडतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!