मोदी सरकार आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री

5
अर्थमंत्री निर्मला सीतारमन  यांच्या नावे नवा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे. सीतारमन या आपल्या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. त्यांनी सलग पाचवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे.  आज अर्थमंत्री निर्मला यांनी बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकारच्या काळात सीतारमन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.

२०१४ मध्ये देशात मोदी सरकार आल्यानंतर अरुणने जेटली यांनीं सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला. जेटली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार संभाळणारे मंत्री पियुष गोयल यांनी २०१९ -२० साठी अंतरिम अर्थसंकल्प किंवा मतदानाचा अहवाल सादर केला. त्यानंतर सलग पाच वेळा अर्थमंत्री म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड निर्मला सीतारमन यांच्या निनावे नोंद झाला आहे. अरुण जेटली, पी चिदंबरम, यशवंत सिंन्हा, मनमोहन सिंग आईनं मोरारजी देसाई यांच्यानवे आधी हा रेकॉर्ड नोंदवण्यात आला आहे.
सर्वाधिक जास्त वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. १९६२ ते १९६९ या कालावधीत त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. चिदंबरम यांनी जवळपास नऊ वेळा सदर केला आहे. अशा प्रकारे वेगवेगळे रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहेत. आज निर्मला सीतारामन यांच्या नावे हा रेकॉर्ड आता नोंदवण्यात येत आहे. आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. मोदी सरकार 2.0 आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री

Get real time updates directly on you device, subscribe now.