रेशन कार्डधारकांना दिलासा! 5 किलो गहू अन् तांदुळ मोफत योजना सुरुच रहाणार

16

मुंबई: कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मोदी सरकारच्यावतीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्याचा धडाका सुरुच आहे. बुधवारी कृषी कायदे मागे घेण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता रेशन दुकानात मिळणाऱ्या गहू-तांदळा बद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अणखीन चार महिने नागरिकांना गहू आणि तांदुळ हे  मोफतच दिले जाणार आहे.

मार्च 2022 पर्यंत आहे त्याच दरात ह्या अत्यावश्यक वस्तू मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. यानंतर ही घोषणा करण्यात आली.

कृषी सुधारणा कायदे मागे घेतल्यानंतर लागलीच धान्यांच्या दराबाबत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेशनवरील धान्य हे विकत देण्याच्या तयारीत सरकार होते मात्र, आज केंद्रीय कॅबिनेटची बैठकीत वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये पहिला निर्णय रेशनच्या धान्यबद्दल घेण्यात आला. मध्यंतरी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना पाच किलो गहू-तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती.

ही योजना गेल्या 15 महिन्यांपासून सुरू आहे. आता केंद्र सरकारने या योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गरीबांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.