श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

22

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभे सोबतच चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २६ फेब्रुवारी मतदान होणार आहे. चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी श्रीमती अश्विनी जगताप यांना भाजप कडून उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपा बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी वहिनी जगताप यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्याशी होणार आहे.

आज भाजप, बाळासाहेबांची शिवसेना महायुतीच्या उमेदवार श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या निवडणूक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पाटील यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शंकर जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या सह महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या पुण्यातील या दोन्ही पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या स्वतः प्रचार यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.