विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू… अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबई येथे सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनातील कार्यालयात श्री गणेश मूर्तीची पूजा केली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून कामकाजाला सुरुवात केली.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी चंद्रकांत पाटील यांनी विधान भवन परिसरात माननीय महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आगमन झाले. यावेळी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यासोबतच पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.प्रथेप्रमाणे राज्यपालांना विधानभवन आवारात राज्य पोलीसांकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यपालांनी राज्य विधान मंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले.