मुंबई : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यातील विद्यापींठामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले.
चंद्रकांत पाटील याची म्हटले कि, याशिवाय आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी कमीत कमी ५०० क्षमतेचे व जास्तीत जास्त १००० क्षमतेचे विद्यापीठाच्या परिसरात वसतीगृह उभारावे आणि स्थानिक पातळीवरची क्षमता लक्षात घेऊन त्या त्या विद्यापीठांनी तातडीने प्रस्ताव तयार करून आदिवासी विकास विभागाकडे पाठवावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना सांगितले.
या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.