सांताक्रूझ-कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय तसेच भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा
मुंबई :उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुंबईतील सांताक्रूझ-कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय तसेच भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत ग्रंथालय व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला आणि कामे वेगात पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या.
या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल बी. रेड्डी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर तसेच उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांची उपस्थिती लाभली.