सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया … आमच्या दृष्टीने बंडखोर सर्व आमदार अपात्र आहेत

110

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सुनावणी पार पडली. हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.  आजच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले कि येत्या  २१ आणि  २२ फेब्रुवारीपासून पुढील सुनावणी होणार आहे. हे प्रकरण पाच नायमूर्तींकडेच राहणार असून याची नियमित सुनावणी होणार आहे.यावरून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत यांनी म्हटले कि, आज निर्णय लागेल असे अपेक्षित होतं. न्यायालयाने सांगितले कि यावर निर्णय घेणे सोपं नाही. असं असलं तरी न्यायालयाला दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यावर निर्णय घ्यावाच लागेल. न्यायालयाने स्पष्ट सांगितले कि, नबाम रेबिया निकाल डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेता येईल असं नाही, असे राऊत यांनी म्हटले.
राऊत यांनी पुढे म्हटले कि, आम्ही स्पष्ट सांगितले कि, हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं. त्याच्या सुनावणीला वेळ लागला तरी चालेल. शेवटी तावून सुलाखून हे प्रकरण बाहेर पडेल आणि संपूर्ण देशासमोर पारदर्शक निकाल येईल. भविष्यात कोणतंही सरकार पैसा देऊन विकत घेतलेल्या बहुमताच्या जोरावर पाडलं काऊ शकणार नाही, असे राऊत यांनी म्हटले. यामध्ये अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे असेही  त्यांनी म्हटले. आमच्या दृष्टीने बंडखोर सर्व आमदार अपात्र आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.