दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले…. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा आणि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा हा विजय – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागांवर विजय मिळवत २७ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. या मिळालेल्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज उच्च व तंत्र तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे भाजपा प्रमुख पदाधिका-यांच्या संघटनात्मक बैठकीनंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो” अशा घोषणा दिल्या.
या विजयानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने विराट विजय संपादित केला. तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपाचे सरकार स्थापन होत आहे. आधी अवघ्या तीन जागा, त्यानंतर ८ जागा जिंकणाऱ्या भाजपाने आज निर्विवाद बहुमत मिळवले. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा आणि भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा हा विजय आहे. दिल्ली दिग्विजयासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अभिनंदन आणि दिल्लीला “आपदामुक्त” केल्याबद्दल दिल्लीकरांना धन्यवाद, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
दिल्लीत भारतीय जनता पक्षानं ४८ तर आम आदमी पक्षानं २२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला यंदा सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपाचे परवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभव केला. या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल गेल्या तीन निवडणुकांमध्ये जिंकून येत आहेत. पण यावेळी त्यांचा परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी पराभव केला,
याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, अरुणराव इंगवले, राहुल चिकोडे, भाजयूमो प्रदेश सचिव अल्केश कांदळकर, सरचिटणीस शिवाजी बुवा, डॉक्टर आनंद गुरव, सौ सुशीला पाटील, डॉ .स्वाती पाटील, गायत्री राऊत, अशोक देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.