के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी मारहाण प्रकरणी कार्यवाही करण्यात येणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरासाठी गेले असता प्राध्यापकाने मारहाण केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी पूर्ण करून दोषींवर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळात दिली.
विधानसभा सदस्य छगन भुजबळ, ॲड. आशिष शेलार आणि धनंजय मुंडे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. पाटील म्हणले कि, सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या तीन सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून या प्राध्यापकावर व्यवस्थापन समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कार्यवाही यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यापीठाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
के. जे. सोमय्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात सरकारने मारहाण झाली असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी यात एफआयआर नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!