बार्शीत डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३’ चे आयोजन…  कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार राजा माने

बार्शी : डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुद्देशीय संस्था ,बार्शी आयोजित डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२२-२३’ , वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता हा वितरण समारंभ संपन्न होणार आहे. कै. यशवंत चव्हाण ग्रंथालय हॉल, श्री शिवाजी कॉलेज कॅम्पस, बार्शी येथे हा सोहळा पार पडणार आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक राजा माने  हे या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष असणार आहेत.

बार्शी येथे रंगणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध वक्ता व इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते संपंन्न होणार आहे. तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी श्री प्रकाश पाटील , खजिनदार श्री जयकुमार शितोळे आणि जॉईंट सेक्रेटरी श्री अरुणजी देबडवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते नऊ क्षेत्रातील नऊ गुणवंतांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात आपले योगदान असणारे श्री शंकर उर्फ बापूसाहेब कोकाटे, कृषी क्षेत्रातील श्री तुळशीदास गव्हाणे , साहित्य क्षेत्रातील प्रा. डॉ. सुनील विभुते, बांधकाम उद्योजक क्षेत्रातील श्री प्रशांत पैकेकर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. श्री किशोर गोडगे, पत्रकारिता क्षेत्रातील श्री चंद्रकांत करडे, शैक्षणिक क्षेत्रातील श्री विजय भानवसे , कला क्षेत्रातील श्री मोहम्मद बागवान आणि क्रीडा क्षेत्रातील प्रा. डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के आदी मान्यवर या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!