लतादीदींच्या नावाने सुरु झालेलं महाविद्यालय लवकरच विश्वविद्यालय होईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

9
मुंबई : लतादीदींच्या नावाने सुरु झालेलं महाविद्यालय हे विश्वविद्यालय करण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत. यासाठी ७० हजार स्क्वेअर फिट इतकी जागा मुंबई विश्वविद्यालयाने आपल्याला दिली आहे. लवकरच त्याचं बांधकामदेखील सुरु होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.

चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत माहिती दिली कि, लतादीदींच्या नावाने जे महाविद्यालय  आपण सुरु केलं ते महाविद्यालय विश्वविद्यालय व्हावं अशा प्रकारची मागणी समोर आलेली आहे. कलिना  कॅम्पसमध्ये  यासाठी ७० हजार स्क्वेअरफिट इतकी जागा हि मुंबई विश्वविद्यालयाने आपल्याला दिली आहे. याचे डिझाईन देखील तयार झाले आहे. लवकरात लवकर त्याचं अंदाज पत्रक तयार होऊन बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती सभागृहात पाटील यांनी दिली.
पाटील पुढे म्हणाले कि, सध्या रवींद्र नाट्यमंदिर मध्ये  लता दीदींच्या नावाने सुरु असणारे  विद्यालय ज्यामध्ये कोर्सेस तर सुरु झालेले आहेत , पण या नवीन जागेमध्ये शिफ्टिंग होताना याचं  विश्वविद्यालय करणं याचा आपण नक्की विचार करू , असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.