शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं – संजय राऊत

विरोधक भांग प्यायले असे श्रीमान देवेंद्र फडणवीस म्हणतात… हा सुध्दा नशेचा अतिरेकी आहे. बांधावर पिकं आडवी झाली… शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण झाली आणि सरकार धुळवडीच्या रंगात नाहून निघालं… ही सत्तेची चढलेली भांग नाहीतर काय?, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राऊत यांनी म्हटले कि, महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे हे सगळ्यांना माहित आहे. आम्ही शुद्धीत आहोत. या लोकांची भांग उतरली कि हे सरकार जाईल. या राज्याची जनता किती शुद्धीत आहे ते कसब्याच्या निकालाने स्पष्ट झाले. भांग पिऊन जे सत्तेवर बसले आहेत त्यांना समजेल कि महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे? त्यांची भांग कसब्यात उतरली आहे , असा टोला राऊत यांनी लगावला.

राऊत यांनी पुढे म्हटले कि, महाराष्ट्रातील जनता भांग पिऊन काहीही करत नाही. कारण भांग पिऊन जनता निर्णय घेत असती तर कसब्यात जो निकाल लागला तो लागला नसता. आम्ही कुठली नशा करत असू तर भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्याची असही राऊत यांनी स्पष्ट केले.

या देशात जे चूक आहे ती चूक दाखवणाऱ्याला देशद्रोही ठरवलं जात. त्याच्या विरोधात तपास यंत्रणा लावली जाते. नऊ विरोधी नेत्यांनी सरकारला पत्र लिहिलं त्यानंतर लालूप्रसाद यादव यांच्या घरी सीबीआयचे लोक आले. मनीष सिसोदिया यांना अटक केली गेली. अशा गोष्टी घडतील मात्र आम्ही झुकणार नाही असे देखील राऊत यांनी म्हटले.