राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी – चंद्रकांत पाटील

मुंबई  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसारख्या हस्ते आज एनईपी अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले.  उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वायत्त महाविद्यालयांच्या कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, राज्यातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, महाविद्यालयचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!