मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेतील अनुपस्थितीबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यावर अजीत पवार यांना जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : विधानसभेच्या कामकाजात लक्षवेधी मांडत असताना संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी बुधवारी सभागृहात जोरदार टीकास्त्र सोडले. यामध्ये संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांचा देखील उल्लेख करत त्यांनी टीका केली. अजित पवारांच्या या टीकेवर चंद्रकांत पाटील यांनी चांगलीच कानउघाडणी करत जोरदार प्रत्युत्तर दिले.
चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात निवेदन सादर करत म्हटले कि, आज मी सभागृहात उपस्थित नसताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे धारधार आरोप केले. त्यांच्या शब्दाला अशी धार होती. सुरुवातीला मी खेद व्यक्त करतो. नेहमीच्या ११ वाजताच्या आणि विधानपरिषदेच्या १२ वाजताच्या सभागृहाच्या वेळेव्यतिरिक्त गेल्या अधिवेशनापासून आपण सकाळी ९ वाजता विधानसभा आणि ९. ३० वाजता विधानपरिषद याचे जास्तीच कामकाज ठरवलं. त्यामुळे वरच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरु होती. मंत्री दीपक केसरकर हे गेले काही दिवस आजारी आहेत. सकाळच्या वेळेला त्यांना काही टेस्ट साठी जावे लागते. वरच्या सभागृहामध्ये अर्थसंकल्पावर चर्चा आहे त्यामुळे त्यांना उपस्थित राहणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी विंनती केल्यामुळे मी वरच्या सभागृहात सहभागी होतो. त्यामुळे मी आज इथे उपस्थित नव्हतो, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.
अजित पवार यांना टोला लगावत चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मी आपल्या इतकं काम करत नाही , परंतु मी पुरेसा काम करतो. सकाळी दोन्ही सभागृहामध्ये ९ वाजता , ज्या प्रकारे कामकाज वाढले आहे त्यामुळे सकाळी ९ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरु राहते, तिथे मी उपस्थित असतो.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे कि रात्री उशिरा मंत्र्यांना लक्षवेधी कन्वे होते त्यामुळे ब्रीफिंग द्यायला वेळ लागतो. आज ५ मंत्री वेगवेगळ्या कारणाने सभागृहात नाहीत. त्यामुळे मी अजित दादांना असं म्हणतो कि आपणं खूप वर्ष राजकीय वातावरणात काम करत आहात. तुमच्या पेक्षा जास्त परंतु सामाजिक कामामध्ये मी आहे. ४५ वर्ष सलग काम केलं . एक जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर काम केलं. तुम्ही ते म्हटलत त्यातून आयुष्यभर एखाद्याने काम केलेलं असत ते डॅमेज करतो त्यामुळे मी आज उपस्थित का नव्हतो याचे सप्ष्टीकरण देण्याची विनंती केली, असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.