कोल्हापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता – चंद्रकांत पाटील

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.