मिल कामगारांच्या घरांच्या बाबतीत लवकरच बैठक घेणार, चंद्रकांत पाटील यांची सभागृहात माहिती

मुंबई  : मिल कामगारांच्या घरांचा प्रश्न हा महत्वचा मुद्दा असून चालू असलेल्या मिल कशा प्रकारे कार्यरत ठेवता येतील यावर उपाय शोधले जाणार आहेत. तसेच बंद पडलेल्या मिल कामगारांच्या घराच्या बाबतीत लवकरच बैठक घेतली जाणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि मी याविषयावर अभ्यास केला आहे आणि त्यावरून माझे मत असे आहे कि, फिनले मिल हि काय बंद पडणारी मिल नाहीय, वर्किंग मिल आहे. त्यासाठी किती भांडवल लागणार आहे ते काढलं तर ती अमाऊंट फार कमी आहे. ५ तारखेला मी यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले.
मुंबईतल्या मिल बंद पडल्यानंतर त्यामिलच्या विक्रीच्या वेळी असा कायदा आला कि, कामगारांना घर द्या. फिनले मिल बंद पडलेली नाही. ती आपल्याला चालवायची आहे. माझे आई वडील दोघेही मिलमध्ये कामाला होते . त्यावेळी सगळ्या मिल बंद पडल्या. त्या विक्रीला काढल्या. तिथे मोठं मोठे कॉम्प्लेक्स झाले. त्यावेळी असा विषय आला कि यातील काही जागा हि गिरणी कामगारांना दिली पाहिजे. तो विषय देखील आहेच असे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिनले मिल आपल्याला सुरु करायची आहे. बंद पडल्यावर जागेच प्रश्न येतो. यासंदर्भात ५ तारखेला बैठक घेणार असून त्यासाठी प्रॅक्टिकल प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.