भाजपाच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा वारसा हा असाच पुढे अखंडितपणे सुरू राहणार – चंद्रकांत पाटील

9

मुंबई : आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस. या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुढील वर्षभरात राज्यातील ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधून केंद्रातील मोदी सरकारच्या तसेच राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. देशाला आधुनिक आणि जागतिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने भाजपा अहोरात्र काम करत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा आज स्थापना दिवस. देशाला आधुनिक आणि जागतिक महासत्ता बनवण्याचे दिशेने भाजपा अहोरात्र काम करत आहे. कुशल, जिद्दी आणि संयमी कार्यकर्त्यांच्या जोरावर आज पक्षाने आपले आजचे हे स्थान मिळवले असल्याचे पाटील म्हणाले.

६ एप्रिल १९८० पक्षाच्या स्थापनेपासून प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी भाजपाने दिली. भाजपाच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा वारसा हा असाच पुढे अखंडितपणे सुरू राहणार असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.