बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना साधं जवळ देखील घेतलं नाही ते आज मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि अजेंडा बदलत आहेत – चंद्रकांत पाटील
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी फडवणीसांची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यासोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं अशीही प्रतिक्रिया दिली जात आहे. याबाबत उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये दुहीची बीज निर्माण केलं आणि ती दुहीची बीज पेरून राज्य चालण्यामध्ये छोटासा वाटा घेऊन मोठी काम करून घेतली. ते या सक्ख्या भावापेक्षा जवळच नातं असणाऱ्यांच्या भांडणांकडे बघून एन्जॉय करतात. या दोन सक्ख्या भावांना काळत नाहीय कि आपण नुसते भांडत नाही तर हिंदुत्वाचे नुकसान करत आहोत. महाराष्ट्रातील हिंदू हा सुरक्षित तेव्हाच व्हायला लागला जेव्हा शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन काही ठोस निर्णय घेतला. हे उत्तम चालले असताना त्याला दृष्ट लागली. या प्रकारचा वाद निर्माण करून काही जण आपला स्वार्थ साधत आहेत असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील पुढे म्हणाले कि बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना साधं जवळ देखील घेतलं नाही ते आज मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि अजेंडा बदलत आहेत. उद्धव ठाकरेंनी भाजप मध्ये यावं हि आमची राजकीय अवस्था नाही. आम्ही समर्थ आहोत. हि हिंदुत्वाची, विकासाची आवश्यकता आहे असे पाटील म्हणाले.
पवार साहेबांनी अनेक राजकीय नेत्यांची माती केली तसेच पक्ष म्हणून तुमची माती करतील. असेही मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले