देशातील पहिल्या खासगी ई-हेल्थ‌ सिस्टिम, हेल्थ डायझेशन व टेलीमेडिसीन सेंटरला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट

5
मुंबई : आज देशातील पहिल्या खासगी ई-हेल्थ‌ सिस्टिम, हेल्थ डायझेशन व टेलीमेडिसीन सेंटरला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली . यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या सेंटरच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामाविषयी माहिती घेतली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या सेंटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध प्रकारच्या आरोग्य चाचण्या आणि त्यांचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून मूल्यांकन करून वैद्यकीय सल्ला दिला जातो. तसेच नागरिकांना त्यांचे एक हेल्थ कार्ड देखील दिले जाते. ज्यात सदर व्यक्तीच्या आरोग्याची संपूर्ण माहिती आणि रिपोर्ट असतात. ही अतिशय उपयुक्त प्रणाली असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

टेलिमेडिसिन म्हणजे जेव्हा आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा प्रकारे प्रगत तंत्रज्ञाचा वापर याठिकाणी करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.