गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या विविध उपक्रमांसाठी व समाजभवनासाठी लवकरच जागा मिळणार – चंद्रकांत पाटील

4

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अखिल भारतीय गोंधळी समाज आयोजित पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाच्या विकासासाठी आपलं सरकार नेहमीच सकारात्मक प्रयत्न करीत असते. याचप्रमाणे गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या विविध उपक्रमांसाठी व समाजभवनासाठी लवकरच जागा मिळणार असून जलद गतीने बांधकाम सुद्धा करण्यात येईल, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, ज्या प्रकारे अशा अनेक समाजांना शिक्षणापासून वंचित ठेवलं गेले, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं गेलं. त्यांना संधी मिळताच ते किती मोठं कार्य करू शकतात हे या कार्यक्रमाच्या रूपाने स्पष्ट झाले. भटके विमुक्त समाज हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून हेरगिरी करत , आपला जीव धोक्यात टाकून महाराजांची सेवा करत असे. अशा समाजतील लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळणं हि अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी केलेले काम समजा पुढे यावे आणि समाजाला प्रेरणा मिळावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इसवीसन १२०० नंतर अनेक आक्रमण झाली . डच आले, इंग्रज आले. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाप्रमाणे त्याने तेच काम करावे असे होत होते. त्यावेळी जीव वाचवण्याची धडपड ते करत होते. त्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी पुढे येत गेल्या. त्यामुळे जी परंपरा सुरु झाली ती सगळ्यांना अमलात आणावी लागली. मग हळूहळू हे कमी कमी होत गेले. १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून यात बदल होत गेले.

गेल्या अनेक वर्षांपासून अशा लोकांना पदमश्री पुरस्कार मिळत आहे जे वंचित घटक आहेत. या समाजातील घटकांना वेगवेगळे पुरस्कार दिले गेले . वंचित समाजातील लोकांच्या संशोधनाला , कलेला , परिश्रमाला सन्मानित करण्यात आले.

समाजासाठी जागा ताब्यात मिळाली यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पाटील मिळाले. एकदा जागा मिळाली कि बांधकाम लगेचच होणार आहे. ती इमारत नऊ महिन्यात बांधून होईल हि माझी जबाबदारी. लोकसहभाग आणि सरकारचे अनुदान अशा दोन्ही बाजूने हे शक्य होईल, असे पाटील म्हणाले. गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या विविध उपक्रमांसाठी व समाजभवनासाठी लवकरच जागा मिळणार असून जलद गतीने बांधकाम सुद्धा करण्यात येईल, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.