मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा नेते रितेश वैद्य आणि विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांच्या निवासस्थानी दिली सांत्वनपर भेट

48

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे रविवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध उपक्रमांना भेटी दिल्या. दरम्यान त्यांनी कोथरूडचे भाजपा नेते रितेश वैद्य यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले, त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यासोबतच विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण यांच्या मातोश्री सौ. शंकुतलाताई चव्हाण यांचे देखील काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या देखील कुटुंबीयांची पाटील यांनी भेट घेतली.

कोथरूडचे भाजपा नेते रितेश वैद्य यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. रविवारी चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. वैद्य कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण यांच्या मातोश्री सौ. शंकुतलाताई चव्हाण यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. पाटील यांनी किशोरजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या दुःखद प्रसंगी आम्ही चव्हाण कुटुंबियांच्या शोकात सहभागी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो अशा भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.