चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे आकाशवाणीच्या हडपसर केंद्रातून ‘मन कि बात’ कार्यक्रमाचा घेतला आनंद
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन कि बात या रेडिओ कार्यक्रमाचा आज शंभरावा भाग प्रसारित झाला. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे आकाशवाणीच्या हडपसर केंद्रातून मन कि बात कार्यक्रमाचा आनंद घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ऐतिहासिक शंभराव्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पुणे आकाशवाणीच्या हडपसर केंद्रातून साक्षीदार झालो. आजच्या कार्यक्रमातून त्यांनी पूजनीय लक्ष्मणराव इनामदार यांना स्मरण केले. त्यासोबत समाजाच्या विकासात मैलिक भूमिका बजावणाऱ्या अनसंग वॉरियर्ससोबत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला.
३ ऑक्टोबर २०१४ रोजी मन कि बात चा पहिला भाग प्रसारित झाला. तेव्हापासून हा रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित केला जातो. नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले कि, शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आले. ती वाचून मी खूप भावुक झालो. मला तुमच्या सर्वांची हजारो पत्र आली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्र वाचण्याचा प्रयत्न केला. मन कि बातच्या माध्यमातून जन आंदोलन सुरु झालं. प्रत्येक समाजात परिवर्तनाचं कारण मन कि बात बनली, असे मोदी यांनी आज म्हटले.