गोध्रा येथे केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचे अधिवेशनास चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

40

गुजरात : आज गोध्रा येथे केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचे अधिवेशनास महाराषट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली. केंद्र सरकारच्या विविध योजनांचे हजारो लाभार्थी या अधिवेशनात सहभागी झाले होते. या अधिवेशनास महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. या बाबत चंद्रकांत पाटील यांनी पोस्ट केली आहे ज्यामध्ये ” त्याठिकाणी प्रत्येक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांच्याशी बोलताना आदरणीय नरेंद्र मोदीजी गरीबांच्या उन्नतीसाठी सदैव तत्पर असतात. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक योजनेत गरिबांचे कल्याण समाविष्ट आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आदरणीय मोदीजींना पत्र लिहून त्यांच्या अनुभवासोबत मोदीजींचे आभार मानले आहेत असे पाटील म्हणाले आहेत. खासदार रतनसिंह राठोड, आमदार सी.के. राऊलजी, जिल्हाध्यक्ष अश्विनभाई पटेल, जिल्हा पंचायत प्रमुख कामिनीबेन सोलंकी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस इशांतभाई सोनी आदी नेते यावेळी उपस्थित होते.

गोध्रा लोकसभा मतदारसंघाचा संघानंतर पाटील हे कपडवंज येथे पोहोचले. कपडवंज शासकीय विश्रामगृहात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. यावेळी जिल्हा सरचिटणीस अपूर्वभाई पटेल, राजेशभाई पटेल, माजी आमदार कनुभाई दाभी, मंडल प्रभारी दशरथभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष विकासभाई शहा, विकासभाई पटेल, जिल्हा मंत्री धवलभाई पटेल, अमूल डेअरीचे संचालक जयेशभाई पटेल, तालुका प्रमुख गणपत सिंग, शहरप्रमुख नरेंद्रभाई पटेल, शहर प्रमुख डॉ. पटेल उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.