आपली अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक विकसित होत आहे याचे संपूर्ण श्रेय माननीय मोदीजींच्या निर्णायक नेतृत्वाला, चंद्रकांत पाटील
गुजरात : महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मोदी @ ९ उपक्रमाअंतर्गत गुजरात दौऱ्यावर असताना त्यांनी खेडा येईल व्यापारी परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गुड गव्हर्नन्स फेस्टिव्हलला 9 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी खेडातर्फे व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेत उपस्थित सर्व व्यापारी बांधवांना चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले. आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशातील प्रत्येक घटकासाठी काम करणारे व्यक्तिमत्व आहे. कोरोना महामारीच्या काळात व्यावसायिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तुम्ही त्याला पुन्हा त्याच्या पायावर उभे राहण्यास मदत केली.तसेच आज संपूर्ण जग आर्थिक मंदीने हैराण झाले आहे. पण आपला देश झपाट्याने विकसित होत आहे. आपली अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक विकसित होत आहे. याचे संपूर्ण श्रेय माननीय मोदीजींच्या निर्णायक नेतृत्वाला जाते असे विचार यावेळी पाटील यांनी उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अपूर्वभाई पटेल, राजेशभाई पटेल, माजी आमदार कनुभाई दाभी, विभागीय प्रभारी विराग शहा, दशरथभाई पटेल, जिल्हा उपाध्यक्ष विकासभाई शहा, विकासभाई पटेल, जिल्हा मंत्री धवलभाई पटेल, अमूल डेअरीचे संचालक जयेशभाई पटेल, तालुका प्रमुख गणपत सिंग, शहरप्रमुख डॉ. नरेंद्रभाई पटेल आदी नेते उपस्थित होते.