सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठाने आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी – चंद्रकांत पाटील

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे विभागाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. पाटील यांनी या बैठकीमध्ये भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकन यादीत महाराष्ट्राचा क्रमांक वरचा असला पाहिजे. सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंग यादीत येण्यासाठी सर्व विद्यापीठाने आवश्यक गुणात्मक सुधारणा करावी याबाबत बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा केली. यावेळी उपस्थित अधिकारी, कुलगुरू आणि मान्यवरांनी या संदर्भात आपले अभिप्राय व सूचना मांडल्या.
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.