उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थी यांच्यासाठी राज्यात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार – चंद्रकांत पाटील

19

मुंबई : त्रिपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थी यांच्यासाठी NSE, आणि “मनी बी प्रा. लि.” या संस्थेमार्फत राज्यात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

हा त्रिपक्षीय सामंजस्य करार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, NSE व मनी बी प्रा. लि. यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आला.

या विशेष अभियानातून गुंतवणुकदारांची गुंतवणूक कशी सुरक्षित राहील, त्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे तसेच शेअर बाजारामधील गुंतवणुकीबाबत जागरुकता याबाबत गुंतवणुकदारांना विविध कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मनी बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दानी, एनएसइ चे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.