पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

18

मुंबई : मुंबई मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षाच्या तरुणीची हत्या करण्यात आली. सध्या याप्रकरणी तसाप सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेत या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी तसेच दुसरी समिती मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेचा अहवाल सादर करण्यासाठी स्थापन करण्याचे आदेश देत १४ जुने पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

याच पार्श्वभूमीवर सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेतील मुलीच्या पालकांची महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. ” या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. तसेच त्यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली.

यासोबतच सदर घटनेच्या तपासा संदर्भात कुटुंबियांना सविस्तर माहिती दिली. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी शासनाने समिती स्थापन केली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिकेला निलंबित केले असल्याचे स्पष्ट केले. तसेच कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आश्वस्त केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येईल, असेही सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.