मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
मुंबई: मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रम काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा मंदिरचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रकांत पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलताना पाटील यांनी “माझे शालेय शिक्षण या संस्थेतून मला घेता आले, याचा मला अभिमान आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेताना स्कॉलरशिप देखील मराठा मंदिर कडून मला मिळाली. तसेच मला घडवण्यात या संस्थेचा खूप मोठा वाटा आहे असे सांगितले.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मराठा मंदिरचे उपाध्यक्ष विलासराव देशमुख, संजय राणे, शंकर पाल देसाई, मराठा मंदिरच्या सरचिटणीस पुष्पा साळुंखे यांच्यासह मराठा मंदिर संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.