प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निकच्या) प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी करणाऱ्या विध्यार्थ्यांना चंद्रकांत पाटलांनी दिला मोठा दिलासा
मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निकच्या) प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी करणाऱ्या विध्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे.
याबाबत पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
काय आहे पोस्ट ?
आजपर्यंत प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या (पॉलीटेक्निकच्या) प्रवेशप्रक्रियेसाठी जवळपास १,४०,००० उमेदवारांनी नोंदणी केली आहे व मागील वर्षीच्या प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १,०९,००० उमेदवारांनी त्यांचे अर्ज आजपर्यंत शुल्क भरून निश्चित केले असल्याचे पाटील यांनी सांगितले असून बरेचशे उमेदवार आजही प्रमाणपत्रा अभावी अर्ज निश्चिती करत नसल्याचे आढळून येत आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर व अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून मान्यता प्रक्रियेची माहिती मिळण्यास होणारा वेळ विचारात घेऊन प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात येत असून सुधारित अंतिम दिनांक ०७ जूलै २०२३ असा आहे. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्या असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.