कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड अँड टेक्स्टाईल पार्क यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट पासिंग ट्रॅकचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार उदघाटन
हातकणंगले : तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड अँड टेक्स्टाईल पार्क यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट पासिंग ट्रॅकचे उद्घाटन रविवार दिनांक 2 जुलै 2023 रोजी सायं. 5.00 वा कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क, घोडावत फार्म हाऊस मागे, हातकणंगले येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकार आवाडे, राजेंद्र येद्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजू आवळे तसेच जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.