नवीन वस्त्रोद्योग धोरण वस्त्रोद्यागातील राज्याचे वैभव पुन्हा आणणारे आणि सर्वसमावेशक,वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : काल मुंबई मंत्रालयात वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ मधील सुधारणेविषयी रेडिमेड, गारमेंट व टेक्नोटेकस्ट क्षेत्रातील तज्ञांच्या समवेत बैठकीचे आयोजन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
यावेळी पाटील यांनी राज्याला वस्त्रोद्योगाची खूप जुनी परंपरा आहे. पारंपरिक पद्धतीने बनणारी पैठणी ही त्या वैभवशाली परंपरेची खूण आहे. म्हणून सर्व घटकांना सामावून घेणारे आणि वस्त्रोद्यागातील राज्याचे वैभव पुन्हा आणणारे सर्वसमावेशक नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले असल्याचे सांगितले.
या बैठकीस या बैठकीला आमदार प्रकाश आवाडे, आमदार समाधान आवताडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, वस्त्रोद्योगचे आयुक्त प्रदीप चंदन व संबंधित अधिकारी उपस्थितीत होते.