अध्यापनासह संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा भर असला पाहिजे, चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान खेळघर उपक्रमातील शिक्षकांशी अनौपचारिक संवाद साधला. आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक शिक्षणकृतीची जोड देणे, या उद्देशातून कोल्हापूरमध्ये खेळघर उपक्रम राबवला जातो.
आज या उपक्रमात अध्यापनाचं काम करणाऱ्या शिक्षकांशी पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली. आजची संस्कारित पिढी ही देशाला उन्नतीकडे घेऊन जाईल. यासाठीच खेळघरसारखे उपक्रम समाजाची गरज आहेत. त्यामुळे अध्यापनासह संस्कारक्षम पिढी घडविण्यावर शिक्षकांचा भर असला पाहिजे, असे आवाहन हि पाटील यांनी यावेळी केले.
