फिनले मिलच्या कामगारांना देण्यात येत असलेले अर्धे वेतन नियमित व वेळत देण्यात यावे चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मुंबई : आज मंत्रालय येथे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फिनले मिल विषयी आढावा बैठक झाली.
यावेळी पाटील यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या कामगारांना देण्यात येत असलेले अर्धे वेतन नियमित व वेळत देण्यात यावे अशा सूचना दिल्या.
मिलमधील कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयुष गोयल यांना तात्काळ पत्र पाठवून मिल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही यावेळी पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार ओमप्रकाश(बच्चु) कडू, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, वस्त्रोद्योग विभागाचे एस.के.सिंग, नँशनल टेक्स्टाईल कार्पोरेशन लिमिटेडचे पी. कुंगूमराज पी, डि.के.नासा, किशोर पवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.